चित्रदुर्ग : कर्नाटकात बेंगळुरूला येत असलेल्या एका बसला अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. या आगीमुळे बसमधील एकूण ५ प्रवासी ठार झाले आहेत. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.
या आगीत सुमारे २७ प्रवासी जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडेतीनच्या सुमाराला या बसमध्ये आग लागली. ही बस विजापूरहून बेंगळुरूला येत होती.
कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील हरियूर येथे राष्ट्रीय महामार्ग-४ वर बुधवारी सकाळी आग लागल्यानेही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांची अजूनही ओळख पटलेली नसल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या आगीत अनेक लोक भाजले. जखमींना हरियूर आणि चित्रदूर्ग येथील सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा बसला आग लागली तेव्हा बसमधील सर्व प्रवासी गाढ झोपलेले होते. या बसला ही अचानक आग कशी काय लागली, हे मात्र समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.