Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: “अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केल्याने उद्धव ठाकरेंना कोणाच्या निमंञणाची गरज नाही”
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

“अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केल्याने उद्धव ठाकरेंना कोणाच्या निमंञणाची गरज नाही”

Surajya Digital
Last updated: 2020/07/20 at 10:52 AM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. अयोध्येशी शिवसेनेचे पूर्वापार नाते आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

खासदार संजय राऊत हे आज सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अयोध्येशी शिवसेनेचं पूर्वापार नातं आहे. हे नातं केवळ राजकारणासाठी नाही. मुख्यमंत्री नसताना आणि असतानाही उद्धव ठाकरे अयोध्येला गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना अयोध्येला जाण्यासाठी कोणत्याही निमंत्रणाची गरज नाही, असे राऊत यांनी म्हटले.

अयोध्येच्या राम मंदिर विषयात शिवसेनेचं नाव यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. मात्र, भाजपशी फारकत घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण मिळणार की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरीही उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेच्या खाञीलायक सूञांकडून मिळत आहे. अयोध्येचा रस्ता हा शिवसेनेने तयार केला आहे. या रस्त्यातील अडथळे शिवसेनेने दूर केले आहेत. राम मंदिरासाठी श्रद्धा आणि हिंदुत्त्वाच्या भावनेतून शिवसैनिकांनी बलिदान केले आहे, असेही राऊत यांनी म्हटले.

येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमीपूजनचा सोहळा संपन्न होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असला तरी मंदिर निर्माणासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न करणाऱ्या संघटना व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #संजयराऊत #अयोध्या #उद्धवठाकरे #निमंञण #रस्ता #राममंदिराचे #भूमिपूजन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article “शरद पवारांचे वक्तव्य मोदींविरोधात नसून भगवान रामाच्या विरोधात आहे”
Next Article स्वॅब घेण्यास टाळाटाळ करणार्‍या आरोग्य विभागातील दोन कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?