Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: खासगी बस – कारचा भीषण अपघात; पाच ठार तर 20 जण गंभीर जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

खासगी बस – कारचा भीषण अपघात; पाच ठार तर 20 जण गंभीर जखमी

Surajya Digital
Last updated: 2020/07/19 at 12:07 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कनोज : उत्तरप्रदेशमध्ये रविवारी सकाळी आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवर खासगी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची भीषणता पाहून मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता दिसत आहे.

ही घटना कनोज जवळील सौरिख पोलीस स्टेशन क्षेत्रात घडली. बस ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ती बस कार ला जाऊन धडकली आणि रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात जाऊन कोसळली. यामुळे या अपघातात मोठी जीवितहानी झाली आहे.

जखमींशी विचारपूस करताना पोलिस अधिकारी

अपघातामधील जखमींनी कन्नौज येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि इटावा येथील सैफई येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस बिहारहून कामगारांना घेऊन दिल्लीकडे जात होती. दरम्यान, कन्नौजच्या सौरीख जवळ समोर उभ्या असलेल्या एका कारला भरधाव वेगात असलेली ही बस धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनं महामार्गावरून खाली येऊन पडली.

अपघातानंतर बसमधील प्रवाशांच्या आराडा-ओरडीचा व किंकाळ्यांचा आवाज ऐकताच, आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली. नंतर काही वेळातच अपघाताची माहिती मिळताच पोलीस देखी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. रुग्णवाहिकेद्वारे जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघात झालेली बस दिल्लीवरून बिहारला जात होती. सौरिख क्षेत्रात ड्रायव्हरचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे हा अनर्थ झाला. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे कानोजच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #Kanoj #कनोज #अपघात #पाचठार #20जखमी #भीषणअपघात
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धक्कादायक…इराणमध्ये अडीच कोटी नागरिकांना कोरोना तर चौदा हजार कोरोनाबळी
Next Article सोलापूर : श्री राम मंदिर कार्यक्रमांविषयी शरद पवारांचे मत

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?