Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘तो’ वीकेंडला असा करायचा प्लॅन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

‘तो’ वीकेंडला असा करायचा प्लॅन

Surajya Digital
Last updated: 2024/05/22 at 2:26 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर: प्रतिनिधी

वीस दिवसापूर्वी जेल मधून सुटलेला कल्याण आणि नवी मुंबईचा सराईत गुन्हेगार शनिवारी किंवा रविवारी सोलापुरात यायचा अन बंद घराची रेकी करून भरदिवसा घरफोडी करून तो पसार व्हायचा. एकाच दिवशी सुमारे चार ते पाच घरे फोडणाऱ्या या आरोपीला पोलिसांच्या तिसऱ्या नजरेने हेरलेच अन हा आरोपी विजापूर नाका डी बी पथकाच्या जाळ्यात अडकला.

सॅमसन रुबीन डॅनियल (वय २५. रा. बेतुरकरपाडा, क्वालिटी कंपनी,डॅनियल हाऊस, रूम नं ५,कल्याण पश्चिम जिल्हा ठाणे) या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी तीन तासात अटक करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

विजापूर नाका पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल असलेल्या घरफोडीच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज च्या साह्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे सोलापूर रेल्वे स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड आणि त्यांच्या पथकाने सोलापूर रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून सराईत गुन्हेगार सॅमसंग डॅनियल याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. व त्याच्याकडून 27 हजार 680 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.

————–

हातावरील टॅटू मुळे चोरीचा लागला छढा

शहरात विविध ठिकाणी चालत फिरून घरफोडी करणारा सॅमसन डॅनियल सीसीटीव्हीत कैद झाला होता.वेशभूषा बदलून घरफोडी करायचा.दुसऱ्या घरफोडीवेळी त्याने जीन्स आणि टी शर्ट परिधान केले होते त्यावेळी चोरट्याच्या हातावर टॅटू काढल्याचे दिसून आले.मुंबई व पुणे येथे सेवा बजावून सोलापुरात नव्यानेच नियुक्त झालेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांनी तपासाची सूत्रे फिरवीत चोरट्याच्या हातावरील टॅटू मुबंईकडील असल्याचं संशय असल्याने मुंबई व कल्याण येथे या आरोपीचे रेकॉर्ड तपासले तेव्हा वरील आरोपी हा कल्याण नवी मुंबई जळगाव येथील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले व वीस दिवसापूर्वीच जेलमधून सुटून आल्याने रेकॉर्डवरील फोटोच्या साह्याने व टॅटू मुळे या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.

——–
वीकेंडला आखायचा चोरी करायचा प्लॅन

कल्याण व ठाणे येथील सराईत गुन्हेगार सॅमसन डॅनियल वीकेंडला सायंकाळी यायचा सोलापुरात अन दिवसभरात रेकी करून घरफोडी करायचा गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा सोलापुरात येऊन त्यांनी घरफोडी केली आहे. यंदा मात्र त्याचा डाव फसला अन तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याने दोन तासात ३ घरफोडी केल्या मात्र त्याच्या हाती म्हणाव तसे घबाड लागले नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

——-

ही विशेष कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शितल कुमार गायकवाड, समाधान मारकड, गणेश शिर्के, हुसेन शेख, सचिन हार, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, सद्दाम आबादी राजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव,रमेश कोर्सेगाव, हरिकृष्ण चोरमुले यांनी केली आहे.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अरारा…राजन पाटलांच्या राजधानीत मोठी धाड
Next Article मृतदेह बाहेर आले तसा हंबरडा फुटला

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?