Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री राममंदिरासाठी 40 किलो चांदीची शिळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार अर्पण; जय्यत तयारी सुरू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

श्री राममंदिरासाठी 40 किलो चांदीची शिळा पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार अर्पण; जय्यत तयारी सुरू

Surajya Digital
Last updated: 2020/07/20 at 2:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

अयोध्या : अयोध्येतील राममंदिराला श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास मणिरामदास छावनीच्या वतीने 40 किलो चांदीची शिळा अर्पण करण्यात येणार आहे. 5 ऑगस्ट रोजी मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी वैदिक मंत्रोच्चारासहीत ही शिळा स्थापन करणार असल्याची माहिती महंत नृत्यगोपाल दास यांनी दिली आहे. जय्यत तयारी चालू असून कोणाकोणाला बोलवयाचे यांचे नियोजन चालू आहे.

नृत्यगोपाल दास म्हणाले,  मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येकाकडून काही ना काही मदत दिली जात आहे. अनेकांनी शक्य असेल तेवढा मदतनिधी दिला आहे. मी न्यासाचा अध्यक्ष राहिलो आहे, सध्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा अध्यक्षही आहे. त्यामुळे या महायज्ञात आपल्या वतीने समर्पण करण्याची जबाबदारी आम्ही या शिळेच्या स्वरुपात पार पाडत आहोत. मणिरामदास स्वामी सेवा ट्रस्ट नेहमीच सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम करत आली आहे, असे नृत्यगोपाल दास यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे रखडलेले राम मंदिराचे काम आता सुरू होणार आहे. ५ ऑगस्टला भूमीपूजनाचा मुहूर्त निश्चित झाला आहे. दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाच्या हालचाली वेग घेऊ लागल्या आहेत. भूमिपूजनासाठी भव्य तयारी केली जात आहे. सर्व नियम लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर अनेक दिग्गजांना आमंत्रण दिले जाऊ शकते.

राम मंदिर चळवळीशी संबंधित अनेकांना या पूजनासाठी बोलावले जाऊ शकते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांना देखील बोलावण्यात येणार आहे. तसेच उमा भारती, विनय कटियार आणि साध्वी ऋतंभरा यांना बोलवले जाऊ शकते.आलोक कुमार, मिलिंद परांडे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सहभागी होऊ शकतात. मोहन भागवत आणि अन्य काही नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सहभागी होऊ शकतात.

You Might Also Like

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!

ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले

युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार

मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले

TAGGED: #राममंदिर #मोदी #महंत #रामजन्मभूमी #जय्यततयारी #अयोध्या #चांदीचीशिळा #अर्पण #40किलो
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड; महाराष्ट्राच्या पाटलांनी दिल्या शुभेच्छा
Next Article सोलापूर शहरात राञी बारापर्यंत दोन मृत्यू तर नव्याने 29 कोरोना बाधित रुग्ण

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?