Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकार नोकरीवरुन काढू नका म्हणत एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा केली खंडीत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सरकार नोकरीवरुन काढू नका म्हणत एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा केली खंडीत

Surajya Digital
Last updated: 2020/07/18 at 12:45 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाला नोकरीवरुन काढू नका, असं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मात्र एसटी महामंडळाने जवळपास 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीने हा निर्णय घेतला.

एसटी बंद असल्याने उत्पन्न रखडलं, त्यामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. कोरोना संकट टळल्यानंतर पुढील परिस्थिती पाहून या कर्मचाऱ्यांना पुन्हा ज्येष्ठतेनुसार सेवेत घेतलं जाणार आहे.

सरकार एकीकडे नोकरीवरुन काढू नका म्हणत असताना एसटीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची सेवा खंडित केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 2019 च्या भरतीमधली ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.

जवळपास 8500 वाहक, चालकांसह इतर कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित करण्यात आली आहे. ज्यांचं प्रशिक्षण सुरु आहे, त्या कर्मचाऱ्यांचंही प्रशिक्षण थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून याबाबतचं पत्रक विभागीय कार्यालयांना पाठवण्यात आलं आहे.

* एसटीच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

– सरळसेवा 2019 मध्ये भरती झालेले चालक-वाहक यांची सेवा तात्पुरती खंडित करावी.

– भविष्यात गरज असेल तर ज्येष्ठतेनुसार पुन्हा सेवेत घ्यावे

– चालक-वाहक, सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, अन्य अधिकारी किंवा अनुकंपा तत्वावरील जे उमेदवार प्रशिक्षण घेत असतील, ते सुद्धा थांबवावे

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #सरकारीनोकरी #कोरोनासंकट #corona #एसटीकर्मचारी #सेवाखंडीत #चालकवाहक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानला निघालेला उस्मानाबादचा तरुण बीएसएफच्या ताब्यात
Next Article तैवानच्या संसदेत तुफान राडा; अनेक खासदार जखमी

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?