ठाणे, 17 एप्रिल (हिं.स.)। मुंबई उच्च न्यायालय येथे दाखल क्रिमिनल रीट पेटीशन नं.2911/2022 च्या अनुषंगाने ठाणे उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या आदेशाने कल्याण निवासी नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्यासोबत नडगाव मंडळ अधिकारी दर्शना भावे व ग्राम महसूल अधिकारी आरती कारंडे, गणेश पादीर, देवानंद लोखंडे, लक्ष्मण शिंदे व महसूल सेवक साईनाथ सोनवणे हे खाडीपात्रात गस्त घालत होते.
गस्त घालत असताना कोलशेत खाडी येथे होणाऱ्या अनधिकृत रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी बोटीद्वारे गस्त घातली असता खाडीपात्रामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 1 बार्जेस व 2 सक्शन पंप आढळून आले. हे सर्व साहित्य गॅस कटरने नष्ट करण्यात आले आहे.
