Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ऑपरेशन सिंदूर’मध्ये 100 दहशतवादी ठार

admin
Last updated: 2025/05/08 at 6:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सर्वपक्षीय बैठकीत राजनाथ सिंह यांची माहिती

नवी दिल्ली, 08 मे (हिं.स.) : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळं उध्वस्त केलीत. या कारवाईत सुमारे 100 जिहादी दहशतवादी ठार झाल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देण्यासाठी आज, गुरुवारी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत संरक्षण मंत्री बोलत होते.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देताना सांगितले की, या एअर स्ट्राईकमध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेले आहेत. भारताला परिस्थिती आणखी चिघळायची नाही. पण जर पाकिस्तानने काही आगळीक केल्यास भारत शांत बसणार नाही असे राजनाथ म्हणाले. तसेच केवळ एक कारवाई करून ऑपरेशन सिंदूर संपुष्टात आलेले नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीला राजनाथ सिंह यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही मंत्री उपस्थित होते. तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मल्लिकार्जुन खरगेंनीही बैठकीला हजेरी लावली होती. तत्पूर्वी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या कारवाईला आपले समर्थन दिले. तसेच ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर सर्व पक्षीय बैठक बोलावून सर्व विरोधकांना विश्वासात घेतल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे कौतुक केले.

सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सरकारतर्फे माध्यमांना निवेदन देताना म्हटले की, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सौहार्दपूर्ण पद्धतीने पार पडली. सर्व नेत्यांनी परिपक्वता दाखवत कोणतीही टीका-टिप्पणी केली नाही. ही बैठक एका व्यापक राजकीय हेतून घेतली गेली होती, जिचा उद्देश सफल झाल्याचे रिजिजू यांनी सांगितले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छत्तीसगड : चकमकीत 8 नक्षलवादी ठार, 5 जवान हुतात्मा
Next Article भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानी हल्ला निष्क्रीय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?