Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: हिंदुत्ववाद्यांना बळी न पडल्यामुळे विविध क्षेत्रातील 104 जणांकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

हिंदुत्ववाद्यांना बळी न पडल्यामुळे विविध क्षेत्रातील 104 जणांकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन

Surajya Digital
Last updated: 2020/10/23 at 9:46 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : एकीकडे राज्यातील मंदिरे उघडावेत यासाठी प्रमुख विरोधी पक्ष भाजपसह इतर अनेक धार्मिक संघटनांकडून राज्य सरकारवर दबाव आणला गेला. मात्र राज्यातील काही महत्वाच्या बुध्दीजीवी व्यक्तींनी कोरोनाच्या काळात धार्मिक भावनांपेक्षा लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिल्याबद्दल आणि राज्याचे राज्यपालांनी मंदिरे उघडावित यासाठी टाकलेल्या दबावाला बळी न पडता ठामपणे भूमिका घेतल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे.

या पत्रात म्हंटले आहे की, ” शासनासमोर दोन पर्याय आहेत . एकतर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे लोकांच्या श्रद्धांचा विचार करायचा. सेक्युलारिझमचे तत्व असे कि शासनाचे कर्तव्य लोकांच्या ऐहिक (सेक्युलर) हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील तर शासनाने ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूने उभे रहावे. पण राज्यपालांची भूमिका तुम्ही लोकांच्या श्रद्धांच्या बाजूने उभे राहावे अशी आहे. लोकांच्या श्रद्धांचा राजकारणासाठी असा उपयोग आम्हाला अतिशय आक्षेपार्ह वाटतो. कारण अशा श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकारण यशस्वी झाले आणि मंदिरे उघडली गेली तर ते भाविकांच्यासाठीच धोक्याचे ठरू शकते.”

पत्रामध्ये हिंदू परंपरेतील तुकाराम , ज्ञानेश्वरांच्या भागवत परंपरेचा उल्लेख करताना म्हंटले आहे की ,” हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी, देव फक्त मंदिरात असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे आम्ही सर्व ही परंपरा मानणारे लोक आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात आनंद असतो पण ‘देव देव्हाऱ्यात नाही , देव मूर्तीत ना मावे , तीर्थक्षेत्रात ना गावे , देव आपणात आहे , शीर झुकवोनिया पाहे ‘ अशी माणसाच्या श्रद्धेला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणेच कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी असल्याचे नमूद केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या पत्रात त्यांनी राज्यघटनेतील धर्म स्वातंत्र्यासंबंधीचे कलम 25 चा आधार घेऊन असं सांगितले आहे की नागरिकांच्या आरोग्याला बाधा येत असल्यास धर्म स्वातंत्र्यावर आवश्यक ते प्रतिबंध लावण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत.

या पत्रात पुढे म्हंटले आहे कि सेक्युलर व्यक्ती श्रद्धा बाळगणारी, धर्माचरण करणारी असू शकते. पण या व्यक्तीची भूमिका अशी असते की सार्वजनिक हितासाठी लोकांच्या धर्मस्वातंत्र्यावर बंधन आणण्याचा अधिकार हा सेक्युलर शासनाला असतो.
प्रश्न श्रद्धेचा असतो तेंव्हा ठाम भूमिका घेणे कठीण असते असे नोंदवून पत्रात म्हंटले आहे की राज्यपालांच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सेक्युलर भूमिका घेतली याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

* यांचा आहे समावेश

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे, लेखिका शांता गोखले कादंबरीकार रंगनाथ पठारे , वैज्ञानिक डॉ. हेमचंद्र प्रधान , कवयत्री नीरजा, नाटककार जयंत पवार , सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे , आयुकाचे माजी डायरेक्टर डॉ . नरेश दधीच , चित्रकार सुजित पटवर्धन , शिक्षणतज्ञ विद्या पटवर्धन, फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसीचे आशुतोष शिर्के अश्या महाराष्ट्रातील सामाजिक ,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील 104 लोकांचा यात समावेश आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #हिंदुत्ववाद्याला #बळी #नपडल्यामुळे #विविधक्षेत्रातील #104लोकांकडून #मुख्यमंत्री #उद्धवठाकरेंचे #अभिनंदन
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयपीएल बेटिंगप्रकरणी दोघांना अटक; मोठ्या रॅकेटची शक्यता
Next Article चहलच्या पत्नीचा दुबईतील व्हायरल डॉन्सचा धुमाकूळ

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?