Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: … या तारखेला दहावी-बारावीचा निकाल !
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

… या तारखेला दहावी-बारावीचा निकाल !

Surajya Digital
Last updated: 2022/05/09 at 10:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

मुंबई : दहावी आणि बारावीच्या परीक्षेची पेपर तपासणी जवळपास पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच दहावीचा निकाल 20 जूनपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच बारावीचा निकाल 10 जूनपर्यंत लागेल, अशी माहिती देण्यात आली आहे. … 10th-12th result on this date!

राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. आपण मागच्या वर्षी चा विचार केला तर कोरोना महामारी च्या संकटामुळे परीक्षा झाल्यानव्हत्या.परंतु या वर्षी दहावीच्या परीक्षा 15 मार्च 2022 पासून सुरू झाल्या व चार एप्रिल 2022 रोजी संपली. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती वयातील आठ लाख 89 हजार 584 विद्यार्थी आणि 7 लाख 49 हजार 887 विद्यार्थिनी यांनी परीक्षा दिली होती. शिक्षण बोर्डाने आता निकालाची संभाव्य तारीख जाहीर केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांसमोर असलेली निकालाची चिंता काहीशी मिटली आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.

https://www.facebook.com/109399567404448/posts/537263591284708/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

कोरोना आणि शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्यामुळेसुद्धा निकाल प्रक्रियेस विलंब झाला आहे. विद्यार्थ्यांचे पेपर झाल्यावरसुद्धा असेच पडून होते. कारण विनाअनुदानित शिक्षकांनी पेपर तपासण्यावर बहिष्कार घातला होता. शिक्षकांच्या भूमिकेमुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये उशीर होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

 

शिक्षकांच्या पेपर तपासणी बहिष्कारामुळे निकाल उशिरा लागण्याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. पण जून महिन्यातच दोन्ही परीक्षांचे निकाल लागणार असल्याची माहिती बोर्डाकडून दिली आहे. परीक्षेतील शेवटच्या पेपरच्या ६० दिवसांनंतर निकाल जाहीर करण्याची प्रमाणिक प्रक्रिया आहे. पण यावेळी इयत्ता बारावीची परीक्षा पंधरा दिवस उशिरा सुरू झाली होती. त्यामुळे बारावीचा निकाल १० जूनपर्यंत जाहीर होईल, असं बोर्डानं म्हटलं आहे. तसंच बारावीचा निकाल लागल्याच्या १० दिवसांनंतर इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कोरोना परिस्थितीमुळे परीक्षा होऊ शकल्या नव्हता. तर यंदा दहावीच्या परीक्षा १५ मार्च २०२२ पासून सुरू झाल्या होत्या. तर ४ एप्रिल २०२२ रोजी संपल्या होत्या. यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती.

दरम्यान, इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल वेळेवर लागतील असं आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील दिलं होतं. त्यामुळे आता शिक्षण बोर्डानंच निकालांची संभाव्य तारीख जाहीर केल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांसमोर चिंता काहीशी मिटली आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/537282474616153/

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #10th #12th #result #date #ssc #hsc #board, #तारीख #दहावी #बारावी #निकाल #एसएससी #एचएससी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवपुत्र संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल – विजयसिंह मोहिते – पाटील
Next Article Shower and Tower अभिनेता रितेश देशमुखांच्या तोंडून ‘शॉवर अँन्ड टॉवर’ वॉटर पार्कचे कौतुक

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?