Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

शनिशिंगणापूर देवस्थानातून 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांची गच्छंती

admin
Last updated: 2025/06/13 at 4:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सकल हिंदू समाजाच्या आंदोलनानंतर घेतला निर्णय

अहिल्यानंगर, 13 जून (हिं.स.) : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या 167 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. यामध्ये 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अनियमितता आणि शिस्त पालन न केल्याच्या कारणावरुन या कर्मचाऱ्यांची गच्छंती केल्याचे शनि देवस्थानकडून स्पष्ट करण्यात आले. देवस्थानातील 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांना हटवण्याबाबत सकल हिंदू समाज आंदोलनाच्या पवित्र्यात होता.

श्री क्षेत्र शनि शिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवरुन वाद वाढला होता. शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्टमध्ये काम करणाऱ्या 114 मुस्लिम कर्मचाऱ्यांविरुद्ध हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. ट्रस्टने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावरुन काढून टाकावे अशी संघटनेची मागणी होती. अन्यथा 14 जून रोजी मंदिराबाहेर संपूर्ण हिंदू समाजाकडून मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देखील दिला होता.

गेल्या 21 मे 2025 रोजी मुस्लिम कारागिरांनी मंदिराच्या पवित्र व्यासपीठावर ग्रिल बसवले आणि भगवान शनिदेवाच्या व्यासपीठाची स्वच्छता आणि रंगरंगोटी केली होती. तेव्हा हे प्रकरण अधिकच तापले होते. या घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता मंदिराच्या विश्वस्त मंडळाने सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंदिर ट्रस्टने स्पष्टीकरण दिले होते, त्यानुसार ट्रस्टमध्ये 114 मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले आहे. मात्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या कर्मचाऱ्यांपैकी एकाही मुस्लिम कर्मचाऱ्याची ड्युटी मंदिराच्या मुख्य गर्भगृहात किंवा चबुतऱ्यावर नाही. हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन विभाग आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. यापैकी 99 कर्मचारी मागील 5 महिन्यांपासून कामावर अनुपस्थित असून त्यांच्या पगारावरही आळा घालण्यात आला आहे.

You Might Also Like

मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी

बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संजय राठोड यांच्यासह आ. खोडके दाम्पत्यांची भेट

पुणे – अपघातांना जबाबदार अवजड वाहने करणार जप्त

पालखी सोहळ्यासाठी राज्यातून सुमारे सहा लाख वारकरी सहभागी होण्याची शक्यता

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
Next Article विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर

Latest News

आईला हृदयविकाराचा झटका आल्याने गौतम गंभीर परतला मायदेशी
देश - विदेश June 13, 2025
मुंबईत वीज वितरण परवान्याची महावितरणची मागणी
महाराष्ट्र June 13, 2025
विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाचे खेळाडू काळी फित बांधून उतरले मैदानावर
देश - विदेश June 13, 2025
शैक्षणिक संस्थांमधील रॅगिंग : यूजीसीची महाराष्ट्रातील ३, देशातील ८९ विद्यापीठांना नोटीस
देश - विदेश June 13, 2025
इस्रायल-इराण युद्धावर भारताने व्यक्त केली चिंता
देश - विदेश June 13, 2025
बच्चूभाऊंच्या उपोषणाची दखल न घेतल्याने प्रहारच्या पदाधिकाऱ्याने केलं विष प्राशन
महाराष्ट्र June 13, 2025
सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्यांना सुरुवात
सोलापूर June 13, 2025
बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला संजय राठोड यांच्यासह आ. खोडके दाम्पत्यांची भेट
महाराष्ट्र June 13, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?