पुणे, 9 मे (हिं.स.)
सैन्य दलांकडू न राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या विशेष मोहिमेमुळे देशभरातील काही विमानतळांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम पुणे विमानतळावरही जाणवला असून १३ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
विमानतळ प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली. नागरी उड्डाण महासंचालनालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रद्द झालेल्या उड्डाणांबाबत पूर्ण परतावा किंवा पर्यायी उड्डाणाची व्यवस्था संबंधित एअरलाईन्सने केली आहे. प्रवाशांनी प्रवासाच्या आधी आपली उड्डाण स्थिती संबंधित एअरलाईन्सकडून तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
इंडिगो एअरलाईन्सची अमृतसर – पुणे, पुणे – कोचीन, चंडीगड – पुणे, पुणे – हैदराबाद, राजकोट (हिरासर) – पुणे, पुणे – जोधपूर, पुणे – चंडीगड, पुणे – अमृतसर, पुणे – राजकोट (हिरासर), पुणे – सुरत आणि जोधपूर – पुणे. रद्द झाली.