खास प्रतिनिधी
तुळजापूर सोलापूर : महाराष्ट्राची आराध्य देवता, सात शक्तीपिठांपैकी एक शक्तीपीठ अशी ख्खाती आणि ऐतिहासिक शहर म्हणून प्रसिद्ध असलेले तुळजापूर आता राज्यासह देशाच्या पटलावर चर्चेत आले आहे. या मोठ्या तीर्थक्षेत्राला ड्रग्ज तस्करीचा कलंक लागत आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे येथील तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील चक्क 13 पुजारी ड्रग्ज तस्करीत असल्याची माहिती समोर आली आहे. याने तुळजापूर-सोलापूरसह उभ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. येथील ड्रग प्रकरणात बहुतांश पुजारी पेडलर असल्याची सूत्रांची माहिती आहे. विशेषत्वे, मंदिर समिती प्रशासनाने संबंधित आरोपी पुजार्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे.
तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीची मोठी चर्चा आहे. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या कारवाया होत आहेत. ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आले होते. त्यातूनही राजकीय वर्तुळात वेगळीच मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजार्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे, कारण यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते. आतापर्यंत या प्रकरणात 35 आरोपी निष्पन्न झाले असून, 21 आरोपी अजूनही फरार आहेत. यातील 13 आरोपी पुजारी असून मंदिरातील दररोजच्या पुज्यार्यांचा याच्याशी काही संबंध नसल्याची भूमिका पुजारी मंडळाने घेतलीय.
ड्रग्ज तस्करीला राजकीय नेतेमंडळींच्या ‘संशया’चा हात तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन काही दिवसांपूर्वी समोर आले होते.तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी सोबतचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.तुळजापूर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर व सुमित शिंदे तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी असून दोन्ही आरोपी सोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो समोर आले. यातील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे , भाजपशी संबंधित असून चंद्रकांत उर्फ बापू कने, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष, भाजपशी संबंधित , मात्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता.विनोद उर्फ पिटू गंगणे, माजी नगराध्यक्षाचे पती, भाजपशी संबंधित असल्याचं समोर येत आहे.
थेट सोशल मीडियावर फोटो झळकावल्याने खळबळच खळबळ दुसरीकडे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कार्यकर्ते ड्रग्ज प्रकरणात आरोपी असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या धीरज पाटील यांनी केला आहे. हा आरोप करताना धीरज पाटील यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आणि आरोपीचे सोबतचे फोटो दाखवले आहेत. यासह भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनीही सोशल मीडियावर खासदार ओमराजे निंबाळकर व आरोपीचे फोटो व्हायरल करत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलाय.
पोलीस महानिरीक्षक दोन दिवसांपासून तुळजापुरात तळ ठोकून
त्यामुळेच ही संगळी परिस्थिती पाहता छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी धाराशिव जिल्ह्यात येऊन तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा आढावा घेतला आहे. दोन दिवसांपासून पोलीस महानिरीक्षक मिश्रा हे जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. अशा स्थितीत श्री तुळजाभवानीचे तुळजापूर ड्रग्ज तस्करापासून कोण वाचवणार हा प्रश्न निर्माण झालाय.
काही लक्षवेधी नोंदी…
– तुळजापूरच्या ड्रग्ज तस्करीचा पुणे, मुंबईशी
कनेक्शन असल्याबाबत बारकाईने तपास
– आतार्यंत पोलिसांनी एकूण 25 आरोपींची नावं केली निश्चित
– 14 आरोपींना करण्यात आली अटक
– 11 फरार आरोपींचार शोध सुरु
– पुणे, मुंबईसह अन्य शहरात आरोपींचा कसून शोध