आतापर्यंत १.८३ लाख भाविकांनी घेतल दर्शन
श्रीनगर, 13 जुलै (हिं.स.)। पवित्र अमरनाथ यात्रेचा दहावा दिवस भाविकांच्या उत्साहाने उजळून निघाला. शनिवारी एकूण १९,०२० यात्रेकरूंनी बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले असून, आतापर्यंत एकूण १.८३ लाखाहून अधिक भक्तांनी अमरनाथ गुहेत दर्शन घेतले आहे. ही यात्रा ३ जुलैपासून सुरू झाली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
दरम्यान, १२ वा जथ्था रविवारी सकाळी जम्मू येथून रवाना झाला. ७,०४९ यात्रेकरू भगवती नगर बेस कॅम्प येथून पुढील प्रवासासाठी निघाले. या तुकडीत १,४२३ महिला, ३१ मुले आणि १३६ साधू-साध्वी यांचा समावेश आहे.
यात्रेच्या पहिल्या पाच दिवसांतील भाविकांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
पहिला दिवस (गुरुवार) – १२,३४८
दुसरा दिवस (शुक्रवार) – १४,५१५
तिसरा दिवस (शनिवार) – २१,१०९
चौथा दिवस (रविवार) – २१,५१२
पाचवा दिवस (सोमवार) – २३,८५७
अधिकार्यांच्या माहितीनुसार, यंदा अमरनाथ यात्रेसाठी चार लाखांहून अधिक भाविकांनी पूर्वनोंदणी केली आहे.सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि अन्न व निवासाच्या सोयी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सतत कार्यरत आहे.यात्रा सुखरूप आणि आध्यात्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्र व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांनी संयुक्तपणे व्यापक तयारी केली आहे.
