Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोठा झटका, वार्षिक उत्पन्न एक लाख असणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मोठा झटका, वार्षिक उत्पन्न एक लाख असणाऱ्यांचे रेशनकार्ड होणार रद्द

Surajya Digital
Last updated: 2021/02/03 at 3:53 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई :   वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा अधिक असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरी करणाऱ्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. राज्यात ३० एप्रिल पर्यंत रेशनकार्डची तपासणी होणार आहे. रेशनकार्ड रद्द केल्यानंतर ज्यांना रेशनकार्ड हवे असेल त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत. त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना रेशनकार्ड द्यावे, असे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

वार्षिक एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी नोकरी करणारे अधिकारी, कर्मचारी यांचे रेशनकार्ड रद्द केले जाणार आहे. राज्यात अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी ते ३० एप्रिल अशी तीन महिने ही मोहीम राहणार आहे. या मोहिमेत प्रत्येक रेशनकार्डची तपासणी होणार आहे, कार्डधारकांकडून विहीत नमुन्यातील अर्ज भरून घेतला जाणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अर्जासोबत संबंधित कार्डाधारकाला रहिवासी पुरावा जोडावा लागणार आहे. हा पुरावा एका वर्षातील असणे आवश्यक आहे. अर्ज भरल्यानंतर त्याची छाननी होणार आहे. पुरावा न जोडलेल्या कार्डधारकांचा समावेश “ब’ गटात होईल. या गटातील सर्व रेशनकार्डे रद्द केली जाणार आहेत. ‘तपासणीदरम्यान दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, स्थलांतरित व्यक्‍ती, मयत व्यक्‍ती यांची नावे तत्काळ कमी केली जाणार आहेत. यासह त्या कार्डवरील धान्याचे प्रमाणही कमी होणार आहे. ज्या ठिकाणी संशयास्पद असेल, अशा कार्डांची तपासणी करताना प्रसंगी पोलिसांची मदत घ्या, असे आदेशही अन्न व नागरी पुरवठा विभागाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनांवर काम करणारे आणि ज्ञात मार्गाने वार्षिक एक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांची कार्डे तपासणीदरम्यान रद्द करा. कार्ड रद्द केल्यानंतर ज्यांना रेशनकार्ड हवे असेल त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत, त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना देय असणारे रेशनकार्ड उपलब्ध करून द्यावे, असेही आदेश दिले आहेत. या शोधमोहिमेमुळे अपात्र कार्डधारक मोठ्या संख्येने समोर येण्याची शक्‍यता आहे. ज्यांचे उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे, त्यांना शुभ्र (पांढरे) कार्ड दिले जाते. या शोधमोहिमेमुळे या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कार्ड शुभ्र होणार आहे.

You Might Also Like

उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल

पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला

न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – भूषण गवई

हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा

TAGGED: #Annul #income #1lakh #retioncard #cancelle, #मोठाझटका #वार्षिकउत्पन्न #एकलाखअसणाऱ्यांचे #रेशनकार्डहोणार #रद्द
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले, झाला गोंधळ
Next Article केंद्र सरकार संतापले, ट्वीटरला तो ‘हॅशटॅग’ हटवण्याची दिली फायनल नोटीस

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?