Wednesday, May 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आपले आरोप सिद्ध न केल्यास पद्मश्रीही परत करण्याची कंगनाची तयारी

Surajya Digital by Surajya Digital
July 19, 2020
in टॉलीवुड
0
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आपले आरोप सिद्ध न केल्यास पद्मश्रीही परत करण्याची कंगनाची तयारी
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनाली– बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं. घराणेशाहीवर अजूनही मोठ्या प्रमाणात वाद होत आहेत. सुशांतच्या निधनानंतर सर्वातआधी कंगनाने यी मुद्द्यावर आपलं मत मांडलं होतं. सुशांत बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीचा शिकार झाला आहे. एवढंच नाही तर सुशांतची ही आत्महत्या नसून ठरवून केलेली हत्या आहे, असंही कंगना म्हणाली होती.

कंगनाने सुशांतच्या निधनानंतर अनेक सेलिब्रिटी आणि गटबाजी करणाऱ्यांवर थेट आरोप केले होते. तसेच त्या व्यक्तींबद्दल ती जे बोलले ते कंगना सिद्ध करू शकले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करण्याची तयारीही तिने दाखवली. कंगना म्हणाली की, ती जे काही बोलली ते आधीच प्रसिद्ध झालेलं आहे आणि ती हे पुन्हा सिद्धही करून दाखवेल. कंगनाला याच वर्षी भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानीत केले आहे. आपलं म्हणणे सिद्ध न झाल्यास पद्मश्रीही परत करण्याची तयारी कंगनाने दर्शविली आहे.

यानंतर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी येत होती. कंगनाने आपल्या वक्तव्यात सिनेसृष्टीतील काही बड्या नावांचा उल्लेखही केला होता. मात्र यानंतरही कंगनाला पोलिसांकडून कोणतेही प्रश्न विचारण्यात आले नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, सुशांतच्या केस संदर्भात चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी समन पाठवला होता. पण सध्या मी मनालीमध्ये आहे आणि मुंबईत जाऊ शकत नाही. तसेच तिचा जबाब नोंदवून घेण्यासाठी मुंबईवरून मनालीला कोणाला पाठवण्याचा सल्लाही दिला. मात्र यावर पोलिसांकडून कोणतंही उत्तर आलं नाही.

Tags: #कंगना #सुशांतसिंह #पद्मश्री #परत #सुशांतआत्महत्या #आरोपसिद्ध #मनाली
Previous Post

शिराळा प्रसिद्ध नागपंचमी दिवशी अंबा माता मंदिर बंद; उद्याच्या जिल्हाधिकारी बैठकीत होणार निर्णय

Next Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव; चार इमारती केल्या सील

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव; चार इमारती केल्या सील

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही कोरोनाचा शिरकाव; चार इमारती केल्या सील

वार्ता संग्रह

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
    Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697