सांगली : कोरोनाचा वाढता प्रसार तसेच प्रशासनाचे निर्बंध पाहता अंबामाता मंदिर दर्शनासाठी बंद असेल, मंदिरातील देवीची पूजा, मानाची पालखी पूजन याबाबत माहिती घेऊन परवानगी बाबत उद्या सोमवारी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल ,असे प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी सांगितले.
येथील तहसीलदार कार्यालयात २५ जुलै रोजी होणाऱ्या नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितले की , गर्दी होणार नाही यासाठी शिराळा शहरात येणारे मार्ग बंद करणे आवश्यक आहे. मी लोकप्रतिनिधी आहे म्हणून फिरणे , मंदिरात प्रवेश करणे टाळा, वनविभाग , पोलीस यांचा पूर्ण बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे कोणीही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन तसेच कोरोनामुळे असणाऱ्या सार्वजनिक व वैयक्तिक निर्बंधांचे उल्लंघन करू नये, असे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा सज्जड इशारा दिला.
यावेळी मानाची पालखी, अंबामाता देवीची यादिवशी पाच पूजा होतात. नागमंडळ ना त्यादिवशी मंदिरात येऊन नाग मूर्ती पूजा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यादिवशी शहर बंद ठेवल्यास बाहेरील नागरिक शहरात येणार नाहीत, अशी सूचना करण्यात आली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, सहाय्यक वनसवरक्षक जी. आर. चव्हाण, मुख्याधिकारी योगेश पाटील , नगराध्यक्षा अर्चना शेटे , उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील , वनक्षेत्रपाल सुशांत काळे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम , संजय हिरवडेकर , सुनीता निकम , प्रतिभा पवार , विजय दळवी , उत्तम डांगे , सीमा कदम , बसवेश्वर शेटे , , चंद्रकांत देशमुख , सम्राट शिंदे , संजय इंगवले , डॉ मनोज महिंद , प्रणव महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे , अमित गायकवाड आदी उपस्थित होते.