सांगली : जिल्ह्यात आज पुन्हा रुग्णसंख्या वाढलेली आहे. गेल्या पाच दिवसात रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मर्यादित स्वरूपात रुग्ण संख्या वाढत आहे.
आजच्या माहितीनुसार बाधितांच्या आकडा मर्यादित स्वरूपात वाढत असला तरी, 4 रुग्णांचा आजही मृत्यू झालेला आहे. जिल्ह्यात आज उपचाराखाली 545 रुग्ण आहेत. आजअखेर बरे झालेले रुग्ण संख्या ही 435 इतकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 17 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
आज अखेरची ग्रामीण भागातील रुग्णसंख्या 598 आहे. शहरी भागातील 83 आहे. मनपा क्षेत्रातील 332 आहे. मनपा क्षेत्रात आज चाळीस नवे रुग्ण आढळून आले आहेत. शहरी भागात 4 आणि ग्रामीण भागात 19 नवे रुग्ण आढळून आले.
आज मृत्यू झालेल्या चार रुग्णांपैकी बेळंकी येथील 34 वर्षाचा पुरुष ,सांगली मनपा क्षेत्र 70 वर्षांचा पुरुष, मिरज मनपा क्षेत्र 48 व 65 वर्षांचा पुरुष आहेत. आजच्या नवीन पॉझिटिव्ह रुग्ण संख्येमध्ये मनपा क्षेत्र, नेलकरंजी आरेवाडी, कडे गाव, शिराळा, खानापूर, कवठे पिराण, तासगाव शिरगाव या परिसरातील रुग्ण आहेत.
* तालुकानिहाय रुग्णसंख्या – आटपाडी 80 ,जत 106 ,कडेगाव 51 ,कवठेमहांकाळ 27, खानापूर 34, मिरज 65, पलूस 61, शिराळा 150, तासगाव 28 ,वाळवा एकूण 79, मनपा 332 अशी आहे.