वेळापूर : माळशिरस तालुक्यातील एमआयडीसी व नीरा देवधरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः मी लक्ष घालणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांनी उत्तमराव जानकर यांना शब्द दिला आहे.
माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी नुकताच माळशिरस तालुक्याचा दौरा केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी जानकर यांनी तालुक्यातील एमआयडीसी व नीरा देवधरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यास निधी उपलब्ध करून, द्यावा तसेच तालुक्यातील ओढे खोलीकरनासाठी निधी उपलब्ध करावा, रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात यावा, कोरोनासाठी विशेष लक्ष द्यावे, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.
यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष काकासाहेब साठे, मोहोळचे आमदार यशवंत माने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, शिवदास जानकर, वेळापूर सरपंच विमलताई जानकर, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे, पं. स. सदस्य अजय सकट, धानोरे सरपंच जीवन जानकर, गटनेते पांडुरंग मंडले, उपसरपंच जावेद मुलाणी, युवा नेते शंकरराव काळे पाटील, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस किरण साठे, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. धनंजय साठे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष पिनूभाऊ येडगे, राहुल खटके, माळशिरस तहसीलदार अभिजीत पाटील, डॉ. तुकाराम ठवरे उपस्थित होते.