बीजिंग : कोरोनाच्या काळात जगभरातील अनेक देशांमधील अनेक उद्योगांवर संक्रात आली असताना एका क्षेत्रातील उद्योगाने मात्र, दिवाळी साजरी केल्याचे चित्र आहे. या उद्योगातील उत्पादनाला चांगलेच मार्केट आले आहे. चीनच्या डुबत्या अर्थव्यवस्थेलाही याच उद्योगाने हातभार लावल्याचे समोर आले आहे.
या उद्योगातील उत्पादनाची मागणी तब्बल ३० टक्क्यांहून अधिक वाढली. हा उद्योग म्हणजे सेक्स टॉयजचा आहे. त्यामुळे लॉकडाउनमुळे संकटाच्या गर्तेत सापडलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेला सेक्स टॉयजने वाचवण्यासाठी हातभार लावला आहे.
कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउन लागू केला. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. चीनच्या अर्थव्यवस्थेला सेक्स टॉयज निर्मिती करणाऱ्या क्षेत्राने काही प्रमाणात हातभार लावला. कोरोनाच्या काळात चीनमधून होणाऱ्या निर्यातीत आणि उत्पादन क्षेत्रात घट झाली असताना सेक्स टॉयजला जगभरातून मागणी होती.
साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीनमध्ये निर्मिती होणाऱ्या सेक्स टॉयजला जगभरातून मोठी मागणी होती. देश-विदेशातून मोठ्या संख्येने सेक्स टॉइजची मागणी नोंदवण्यात आली. चीनमधील शॅडोंगमध्ये सेक्स टॉइज बनवणाऱ्या लिबो टेक्नोलॉजीचे सेल्स मॅनेजर वायलेट डू यांनी सांगितले की, फेब्रुवारीत लॉकडाउननंतर कंपनी सुरू झाल्यानंतर सेक्स टॉयजची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्हाला कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढवावी लागली.
फ्रान्स, अमेरिका आणि इटली या देशांमधून आम्हाला सर्वाधिक ऑर्डर मिळाल्याची माहिती डू यांनी दिली. ग्राहकांची मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वाहतूक थांबल्यामुळे चीनमधील मागणी घटली असल्याचे त्यांनी सांगितले. देशातंर्गत बाजारपेठेत मागणी वाढणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“सेक्स टॉयजची मागणी पूर्ण करण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. लॉकडाउनमुळेच सेक्स टॉयजच्या मागणीत मोठी वाढ झाली असल्याचे डू यांनी सांगितले. येणाऱ्या काही दिवसांत युरोप आणि अमेरिकेतूनही मोठी मागणी नोंदवण्यात येईल”
वायलेट डू – सेल्स मॅनेजर, लिबो टेक्नोलॉजी