माढा : माढा तालुक्यात 7 गावामध्ये मिळून 9 रूग्ण नव्याने कोरोनाबाधित झाले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 99 झाली आहे. यामुळे माढा तालुका शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे.
गुरुवारी आलेल्या अहवालात भोसरे येथे 1 रिधोरे 1 कुर्डूवाडी 1 अशा जुन्या कोरोनाबाधित गावासह उपळाई खुर्द 3 भिमानगर 1 बारलोणी 1 पापनस 1 या नवीन गावामध्ये रूग्ण सापडल्याने तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.
तालुका प्रशासन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ नये यासाठी सातत्याने विविध उपाय योजना अवलंबित आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी टेंभुर्णी गावाने लाॅकडाऊन यापूर्वीच घेतला आहे. तर हाॅटस्पाॅट बनू पाहत असलेल्या कुर्डूवाडी शहरासह माढा शहरानेही लाॅकडाऊन सुरू ठेवला आहे.
कोरोनाबाधित सापडलेल्या परिसराला सील करण्यासह संपर्कातील व्यक्तींना तातडीने क्वारंन्टाईन करून टेस्ट करून घेण्यात येत आहे. तरीही नवीन गावामध्ये रूग्ण आढळून येऊ लागल्याने मोठी चिंता वाढली आहे.