मोहोळ : मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस नाईक सयाजीराव होवाळ यांनी ५ हजाराची लाचेची मागणी केल्याने त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अॅन्टी करप्शन विभाग सोलापूर यांनी केली.
याबाबत अधिक माहिती अशी, १६ मार्च रोजी तक्रारदार व त्यांचा भाऊ, पत्नी दोन मुले यांच्या विरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात ३२४, १४३ वगैरे भादवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात भाऊ, पत्नी व दोन मुले यांना अटक न करता नोटीस देवून सोडून देण्यासाठी व पुढ केसमध्ये सहकार्य करण्यासाठी लोकसेक पोलिस नाईक सयाजीराव होवाळ यांनी ६ हजाराची लाचेची मागणी केली. यावर तक्रारदाराने सोलापूर येथील अॅन्टी करप्शन विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती.
१६ मार्च ते ०२ जुलै २०२० दरम्यान तडजोडीअंती ५ हजाराची मागणी केल्याचे निष्पन झाले. त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक सयाजीराव लक्ष्मण होवाळ याचे विरुध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपआयुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधिक्षक संजीव पाटील, पोलिस निरीक्षक कविता मुसळे, सफौ सोलनकर,म पो ना पकाले, पवार सन्नके यांच्या पथकाने केली.