सांगली : सांगली महापालिका क्षेत्रातील मृत्युदर हा सरासरीपेक्षा जास्त आहे. परराज्यातून पर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांचे मृत्यू प्रमाण जास्त आहे. सांगली जिल्ह्याचे मृत्यू प्रमाण साडेतीन टक्के आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील मृत्युदर हा सरासरीपेक्षा जास्त आहे. देशाचा मृत्यूदर 2. 44 टक्के आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोना कक्षातील एक डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आला व तेथील 3 कर्मचाऱ्यांना ताप आला आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सांगलीतील एक पोलीस उपनिरीक्षक, दोन वाहतूक पोलिस, आणि आटपाडीतील तीन पोलिस पॉझिटिव्ह आले आहेत.
सांगली मनपा क्षेत्रात नवीन 57 पॉझिटिव्ह, शहरी भागात नवीन 6 आणि ग्रामीण भागात 7 अशी संख्या आहे. एकूण रुग्ण संख्या 1284 वर पोहोचली असली तरी प्रत्यक्ष उपचाराखाली 560 रुग्ण आहेत. बरे झालेली रुग्णसंख्या 682 इतकी आहे. अतिदक्षता विभागात 40 रुग्ण गंभीर अवस्थेत आहेत. नवीन आढळलेले रुग्ण हे मनपा क्षेत्र त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील लेंगरेवाडी, नागज, भोसे, ब्रम्हणाळ,बांबवडे, मिरज, व सांगली, येथील रुग्णांचा समावेश आहे.
* तालुकानिहाय रुग्ण संख्या
– आटपाडी 92,जत 112, कडेगाव 54, कवठेमहांकाळ 33, खानापूर 42, मिरज 83,पलूस 70,शिराळा 160, तासगाव 31, वाळवा 90, मनपा 517