सोलापूर : राज्य सरकारने प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द केलेल्या असूनही विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेत आहे. हे परीक्षा शुल्क परत देण्याची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापुरात लॉकडाऊन असूनही विद्यापीठाच्या आदेशावरून काही महाविद्यालये विद्यार्थ्यांवर दबाव टाकून २५ तारखेपर्यंत शुल्क भरा म्हणत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार विद्यापीठास निवेदन दिले आहे. त्यावर समाधानकारक उत्तर विद्यापीठाकडून मिळालेले नाही. विद्यापीठाने तत्काळ परीक्षा फी रद्द करण्याबाबत निर्णय न घेतल्यास विद्यापीठाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा अभाविपचे महानगरमंत्री सूरज पावसे यांनी दिला आहे. याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वारंवार विद्यापीठास निवेदन दिले आहे. त्यावर समाधानकारक उत्तर विद्यापीठाकडून मिळालेले नाही. विद्यापीठाने तत्काळ परीक्षा फी रद्द करण्याबाबत निर्णय न घेतल्यास विद्यापीठाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे, असे अभाविपचे महानगरमंत्री सूरज पावसे यांनी सांगितले. याबाबत निवेदन देण्यात आले आहे