पुणे : राज्य सरकारने काही अटी-शर्तींसह चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यास मराठी चिञपटातील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी खोचक सल्ला दिला आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी विरोध केला आहे. 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्यामुळे त्याला सरकारने परवानगी द्यावी, असेही ते म्हणाले.
लॉकडाऊनदरम्यान ठप्प झालेल्या चित्रपटसृष्टीतील कामे पुन्हा सुरु झाले आहेत. राज्य सरकारने काही अटी-शर्तींच्याअधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. मात्र 65 वर्षावरील कलाकारांना सेटवर काम करता येणार नाही, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
(प्रत्येक क्षेञातील बातमी वाचायचीय, मग सुराज्य डिजिटल ला क्लिक करा)
या सूचनेनंतर महाराष्ट्र सरकार याबाबतचा कायदा करणार असल्याचं बोललं जात आहे. ते चुकीचे आहे. त्यामुळे असा कायदा आणण्याआधी राजकारणातील 60 वर्षापुढील नेत्यांनी राजीनामे द्यावे. त्यांनी आधी निवृत्त व्हावे, असा खोचक सल्ला विक्रम गोखले यांनी दिला आहे.
जर राज्य सरकारने कायदा केल्यास ज्येष्ठ कलाकार भिकेला लागतील. त्यामुळे 65 वर्षापुढील कलाकार आपली काळजी घेऊन काम करतील. त्याला सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रम गोखले यांनी केली