तुळजापूर : हिंदु धर्मियाचा पविञ सण असलेल्या आजच्या नागपंचमीवर संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाचे सावट असल्याने श्री तुळजा भवानी मातेच्या मंदिरात प्रवेश बंद होते. या वर्षी महिला भगिनींना श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील होम कुंडासमोर ठेवण्यात आलेल्या नागदेवताची इतिहासात प्रथमच पूजेविना वंचित राहावे लागले.
माहिला भगिनीची यावर्षीची नागपंचमी कोरोनाच्या सावटाखाली साजरी झाली. श्री तुळजाभवानी मंदिरात आज शनिवारी मंदिरातील होम कुंडासमोर पारंपरिक पद्धतीने प्रति वर्षाप्रमाणे पंचधातुच्या नागदेवताची मूर्ती ठेवण्यात आली होती. नागपंचमीनिमित्त शनिवारी पहाटे श्री नागदेवता नागपंचमी दिनी प्रथम दुग्धाभिषेक घालून विधिवत पूजा केली.
तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
यावेळी श्री तुळजा भवानी मातेचे मुख्य महंत वाकोजी बुवा, श्री भवानी शंकर मंदिराचे गुरुव दिनेश ईनामदार, उमेश ईनामदार, श्री देवीजीच्या चरण तीर्थ मंडळाचे सेवेदारी वर्ग श्री तुळजा भवानी मंदिराचे कर्मचारी मार्तंड दीक्षित, आदीसह मंदीर कर्मचारी उपस्थित होते.
नागपंचमी महिला भगिनीचा आकर्षणाचा सण म्हणून ओळखला जातो. हा सण वर्षातून एकदाच साजरा केला जातो. शहरातील बाजार पेठामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिला वर्गाची खरेदीसाठी मोठी गर्दी असते. परंतु या वर्षी प्रथमच संसर्गजन्य कोरोना साथीच्या रोगाने संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात धुमाकूळ घातल्याने हे चिञ पाहवयास मिळाले नाही.
शहरात ठिक – ठिकाणी महिला भगिनीसाठी झोके बांधले जातात. परंतु या वर्षी कोरोना आणि जनता कर्फ्यु असल्यामुळे झोका खेळण्यासही महिलांवर्गाला मुकावे लागले. नागपंचमी सण आणि गवर हा पण महिलांसाठी आकर्षक सण समजला जातो. हे सण तुळजापुरात साध्या पद्धतीने साजरा झाले. शहरात महिलावर्ग गल्लो गल्ली फेर धरतात, माञ यावर्षी कोरोनामुळे महिलांनी घरात राहणे पसंत केले.