सोलापूर : सोलापूरसह 4 तालुक्यातील लॉकडाऊन आज रात्रीपासून उठणार आहे. मात्र संपूर्ण बार्शी तालुक्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मागच्या लॉकडाऊनपेक्षा आणि राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हा दहा दिवसांचा लॉकडाऊन सोलापुरातील जनतेने यशस्वी केला. कोरोनामुळे राज्यावर मोठं संकट ओढावलं आहे. अशा या जीवघेण्या महामारीला पायबंद घालण्यासाठी चार महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थितीत दिवसेंदिवस आणखी बिकट होत चालली आहे. राज्यात लॉकडाउन कधी उठणार असे सवाल विचारले जात आहे. यातच सोलापूरचे पालकमंञी दत्ताञय भरणे यांनी हे उत्तर दिले. तसेच सोलापुरात आता कधीही लॉकडाऊन लावण्यात येणार नसल्याचेही सांगितले.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सोलापुरात लागू केलेल्या लॉकडाऊनचा किती परिणाम झाला हे आपल्याला आणखी आठ ते दहा दिवसांनी कळेल. तुम्हाला निश्चितच फरक पडलेला दिसेल. मागच्या लॉकडाऊनपेक्षा आणि राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत हा दहा दिवसांचा लॉकडाऊन सोलापुरातील जनतेने यशस्वी केल्याचे सांगितले. बार्शीमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून दररोज बार्शीतील उपायोजनांचा आढावा घेत आहोत. बार्शी तालुक्यातील लॉकडाऊन वाढविण्याची गरज आहे. ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन असेल, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबई, ठाणे आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लॉकडाऊन नसला तरी नियम तेच ठेवण्यात आले आहेत. सोलापूरमध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आणि रुग्णांचे मृत्यू बार्शी तालुक्यात झाले आहे.