भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती स्वतः त्यांनी ट्विट करत दिली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझ्यामध्ये कोविड 19 ची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर मी कोरोनाची टेस्ट केली. त्यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी माझ्या सर्व साथीदारांना आवाहन करतो की, मागील काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोनाची टेस्ट करून घ्यावी. तसेच अन्य लोकांनी क्वारंटाइन व्हावे.
तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध
पुढे ते म्हणाले, मला डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी आता कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या चिरायू रुग्णालयात दाखल होत आहे. तसेच कोरोनाच्या रुग्णांनी मी घरीच क्वारंटाइन होतो किंवा हॉस्पिटलमध्ये नाही जाणार असा, हट्ट न करता सर्वांनी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.