सोलापूर : पावसाळ्यास सुरुवात झाल्या पासून सोलापूर जिल्ह्यात दीडपट पाऊस झाल्याची कृषी विभागाकडे झाली नोंद आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
यंदा पावसाळ्यातील ५० दिवसांत अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १७५.९० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना २६९.६० मि.मि. (१५३ टक्के) पाऊस झाला आहे. यामध्ये जून महिन्यात १०२.५० मि.मी.च्या तुलनेत १४९.४० मि.मी. पाऊस झाला आहे. जुलैमध्ये २३ जुलैपर्यंत ७३.४० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना १२०.२० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सरासरी पावसाच्या १४५ टक्के तर जुलै महिन्यात १६३ टक्के पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाकडील नोंदीवरून दिसते.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
उत्तर सोलापूर तालुक्यात २११.८० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात २२६.५० मि.मी. पाऊस झाला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात १८०.३० मि.मी. पाऊस अपेक्षित होता. २१६.६० मि.मी. पाऊस पडला आहे. बार्शी तालुक्यात २०३.१० मि.मी. पाऊस अपेक्षित असताना ३१५.७० मि.मी. पाऊस झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात २०३.४० मि.मी.च्या तुलनेत २४२. ५० मि.मी. पाऊस झाला आहे. मोहोळ तालुक्यात १५५.६० मि.मी. पाऊस अपेक्षित होता, २७८.६० मि.मी. पाऊस झाला आहे. माढा तालुक्यात १६७.८० मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते माञ २९२.९० मि.मी. पाऊस झाला आहे.