मुंबई : देशांतर्गत कमॉडिटी बाजारात आज मंगळवारी सोन्याच्या भावात ०.४ टक्के वाढ झाली आहे. सोने १३२ रुपयांनी वधारले आणि सोन्याचा भाव ५२ हजार ३३२ रुपयांवर गेला आहे. चांदी देखील महागली असून त्यात १.८ टक्के वाढ झाली आहे. सध्या चांदीचा एक किलोचा भाव ६६ हजार ७२६ रुपये झाला आहे. चांदीचा मागील आठ वर्षांत सर्वाधिक दर आहे.
(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)
कमॉडिटी विश्लेषकांच्या मते नजीकच्या काळात सोन्याचा भाव ५२६६० ते ५२९०० च्या दरम्यान राहील. सोमवारी सोन्यात मोठी वृद्धी झाली होती. Goodreturns या वेबसाईटनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५०६६० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५१६६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने ५०८१० रुपये असून २४ कॅरेट ५२०१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४९७९० रुपये तर २४ कॅरेटसाठी ५४३१० रुपये भाव आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१०६० रुपये असून २४ कॅरेट साठी ५२४६० रुपये आहे.
* आयात शुल्कात वाढ
सोन्याच्या किमतीत चालू वर्षात २८ टक्के वाढ झाली आहे. सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठा ग्राहक देश आहे. त्यामुळे देशात सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. मात्र सोने आयातीने वित्तीय तूट वाढत असल्याने सरकारने सोन्यावर आयात शुल्क वाढवलं आहे. सोन्यावर १२.५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. याशिवाय सोन्यावर ३ टक्के जीएसटी ग्राहकाला द्यावा लागतो. त्यामुळे सोन्याची प्रत्यक्ष किंमत ही बाजारभावापेक्षा जास्त असते. दरम्यान, सोन्याच्या उच्चांकी किमतींचा मागणीवर परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांत सोन्याची मागणी कमी झाल्याचे दिसून आले आहे.