नवी दिल्ली : देशतील शेतक-यांसह सर्वसामान्य लोकांपर्यंत हवामानाची माहिती सहजपणे पोहोचावी यासाठी सरकारने एक नवीन मोबाइल अॅप लाँच केलं आहे. भूविज्ञान (पृथ्वी विज्ञान मंत्रालय) मंत्री हर्षवर्धन यांनी ‘मौसम’ नावाचं हे अॅप लाँच केलं. अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले-स्टोअर आणि अॅपल युजर्ससाठी अॅप स्टोअरवर ‘मौसम’ हे अॅप उपलब्ध झालं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
‘मौसम’ अॅपद्वारे हवामानाची सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-एरिड ट्रॉपिक्स (ICRISAT),भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (आयआयटीएम) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी संयुक्तपणे ‘मौसम’ अॅप विकसित केलं आहे.
‘मौसम’ अॅपद्वारे जवळपास 200 शहरांचं तापमान, आर्द्रता, हवेचा वेग, दिशा इत्यादी अनेकप्रकारची माहिती मिळेल. याशिवाय, अॅपमध्ये जवळपास 450 शहरांच्या आगामी सात दिवसांच्या हवामानाबाबतचा अंदाज तुम्हाला कळेल. दिवसातून आठ वेळेस यातील माहिती अपडेट होईल. एखाद्या शहरातील गेल्या 24 तासांमधील आकडेवारीही यात दिसेल. तर, युजर्सना अलर्ट करण्यासाठी सर्व जिल्हे लाल, पिवळा आणि नारंगी या तीन रंगांमध्ये दाखवणारं फीचरही यामध्ये आहे.