टेंभुर्णी : उजनी कालव्याच्या बाजूला दोन दिवसापूर्वी टमटमसह एकाचा विदारपणे खून करुन अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. या खूनाच छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. हा निर्दयी खून कोणी बाहेरच्यांनी केला नसून पोटच्या मुलाने दोघांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे.
शिराळ (ता. माढा ) येथील संजय मारुती काळे याचा शनिवार (ता. २५ जुलै) टेंभुर्णी-अकलूज रोडवरील शेवरेतील उजनी कालव्याच्या बाजूला खून करून मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. या खुनाचा तपास लावण्यात टेंभुर्णी पोलिसांना यश आले आहे. हा खून पोटचा मुलगा आकाश संजय काळे यानेच आपल्या जन्मदात्या पित्याचा दोघा साथीदाराचे मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी दिली. यातील तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
visit us : www.surajyadigital.com
मयत संजय मारुती काळे (वय ५५ , रा. शिराळ, ता.माढा) याचा खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसायासह खासगी सावकारीही करीत होता. त्याचा शेवरे खून करून टेंभुर्णी-अकलुज रोडवारीला शेवरेतील उजनी कालव्याच्या बाजुला हत्या करून मृतदेह टमटमसह जाळूण पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद मयताचा मुलगा अकाश संजय काळे याने दिली होती. फिर्याद देताना पोलिसांना संशय आला. कसून चौकशी केली असता मीच जन्मदात्या वडिलाचा खून केल्याचे कबूल केले.
* खूनाचे कारण आले समोर
जन्मदात्या वडिलाचे बाहेर असणारे अनैतिक संबध या कारणावरून घरात सतत होणारे वाद आणि वडिलाचे सर्वांना घालून पाडून बोलणे या कारणावरून हा खून केल्याचे खुनी मुलाने सांगितले. लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (वय २७ वर्षे ) व अलाऊद्दीन ऊर्फ आलम बासु मुलाणी (वय ३३ वर्षे दोघे रा.सुर्ली ता.माढा) या दोन साथीदाराचे मदतीने केला असल्याची कबुली मुलाने दिली आहे. सदर तिन्ही आरोपींना माढा न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध