सोलापूर : सोलापूर शहरात मंगळवारी आलेल्या काल राञी बारापर्यंतच्या अहवालाता कोरोनाचे 78 रुग्ण आढळून आले आहेत. ऍटेजन टेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तपासणी होत असल्याने निगेटिव्ह रूग्णांची संख्यामध्ये वाढ होत आहेत. मंगळवारी 848 अहवाल निगेटिव्ह तर 78 रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये 42 पुरुष तर 25 महिला रुग्णांचा समावेश आहे. आज 4 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 4 हजार 785 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 2 हजार 820 तर महिला 1 हजार 965 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरांमध्ये 352 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 231 तर महिला 121 रुग्णांचा समावेश आहे. आज 926 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 848 अहवाल निगेटिव्ह तर 78 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
आतापर्यंत 31 हजार 597 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 26 हजार 668 आहे. तर 4 हजार 785 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 529 असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 2 हजार 904 आहे.
आज मृत झालेले चार व्यक्ती हत्तुरे वस्ती परिसरातील 55 वर्षाचे पुरूष, शेळगी परिसरातील 59 वर्षाचे पुरूष, विद्यानगर परिसरातील 60 वर्षाचे पुरूष, थोबडे नगर भागातील 60 वर्षाच्या पुरूषाचा समावेश आहे.