Tuesday, January 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अनलॉक तीनसाठी गृहमंञालयाकडून नियमावली जाहीर; तंदुरुस्त राहण्यासाठी जिम चालू होणार

Surajya Digital by Surajya Digital
July 29, 2020
in Hot News, देश - विदेश
0
अनलॉकच्या तिस-या टप्प्यात जिम आणि चित्रपटगृहे चालू होण्याची शक्यता
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली – कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम अनलॉकमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात येत आहेत. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 3 साठी नियमावली जारी केल्या आहेत.

1 ऑगस्टपासून रात्रभर असलेला कर्फ्यू बंद होणार आहे. तसंच 5 ऑगस्टपासून जिम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, शाळा-कॉलेज 31 ऑगस्टपर्यंत बंदच राहतील. मेट्रो, थिएटर, स्विमिंग पूल बाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉकडाऊनमध्ये कोणत्याही प्रकारे सूट दिली जाणार नाही. सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करता येणार नाही. गर्दी करण्यास सक्त मनाई असेल.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास अनुमती

गृह विभागाकडून अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग आणि आरोग्याशी संबंधित इतर नियमांचं पालन करुन नागरिकांना स्वांतत्र्य दिवस साजरा करता येणार आहे. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना मास्कचा वापर करणं बंधनकारक असेल. याशिवाय सरकारच्या सर्व गाईडलाईन्सचे पालन करणं गरजेचं असेल, असा आदेश केंद्र सरकारकडून जारी करण्यात आला आहे.

* कंटेन्मेंट झोनमध्ये कडकडीत लॉकडाऊन

दरम्यान, कंटेन्मेंट झोन परिसरात 31 ऑगस्टपर्यंत कडकडीत लॉकडाऊन असेल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. कंटेन्मेंट झोन परिसरात फक्त अत्यावश्यक सुविधा सुरु राहतील. केंद्रीय गृह खात्याकडून याबाबत महत्त्वाच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत.

* देशभरात काय सुरु काय बंद?

– कंटेन्मेंट झोनमध्ये मात्र 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन
– जीम उघडण्यासाठी परवानगी
– नाईट कर्फ्यू हटवला, राञी फिरण्यावरील निर्बंध हटवले
– 31 ऑगस्टपर्यंत शाळा बंदच राहणार
– मेट्रो, लोकल ट्रेन बंदच राहणार
– शाळा, कॉलेज आणि सर्व शैक्षणिक संस्था बंदच राहणार
– ऑनलाईन/ सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करुन शिक्षण सुरु राहणार
– सिनेमागृह, नाट्यगृह, जिम, स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, ऑडिटोरियम, असेंबली हॉल बंदच राहणार
– आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी कायम असेल.
– सामाजिक/ राजकीय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणिक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांवरही बंदी कायम असेल.

Tags: #अनलॉक३ #गृहमंञालय #नियमावलीजाहीर #राञी #निर्बंध
Previous Post

रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरावर केला चाकू हल्ला; डॉक्टरामधून तीव्र संताप, तीव्र निषेध

Next Post

बहुचर्चित राफेल विमान दाखल, संरक्षणमंञ्यांनी शत्रूराष्ट्रांना दिला इशारा; मोदींनी केले संस्कृत श्लोकातून स्वागत

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
बहुचर्चित राफेल विमान दाखल, संरक्षणमंञ्यांनी शत्रूराष्ट्रांना दिला इशारा; मोदींनी केले संस्कृत श्लोकातून स्वागत

बहुचर्चित राफेल विमान दाखल, संरक्षणमंञ्यांनी शत्रूराष्ट्रांना दिला इशारा; मोदींनी केले संस्कृत श्लोकातून स्वागत

वार्ता संग्रह

July 2020
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
    Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697