बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांनी 850 चा आकडा ओलांडला असून त्यापैकी शहरामधील रुग्ण 453 असून ग्रामीण मधील 405 आहेत. यातील दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ही 450 वर गेली असून त्यापैकी शहरातील 224 तर ग्रामीणमधील 226 आहेत. शहरामध्ये एकूण 14 आणि ग्रामीण मध्ये 17 असे एकूण 31 रुग्ण मयत झाले आहेत.
रॅपिड अँटीजेनच्या किटचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील चाचण्यांचा वेग काहीसा मंदावला होता. मोठ्या संख्येने किट प्राप्त करण्यासाठी आरोग्य विभाग जातीने प्रयत्न करत होता. खुद्द अरोग्याधिकारी त्यासाठी तळ ठोकून बसले होते. अखेर गुुरुवारी सुमारे 1 हजार किट प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम‘वरही उपलब्ध
आजपर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या अनुषंगाने शहरामध्ये एकूण 131 प्रतिबंधात्मक क्षेत्र तर ग्रामीणमध्ये 49 तयार करण्यात आले आहेत. या क्षेत्रांवर पोलिस आणि नगरपालिका व ग्रामपंचायतीच्यावतीने करडी नजर ठेवली जात असून विनाकारण क्षेत्राबाहेर फिरणार्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.
स्वब चाचणीच्या प्राप्त अहवालानुसार, बार्शी शहरातील अलिपूर रस्ता भागात 4, दाणे गल्ली 2, सुभाष नगर 2, टिळक चौक 1, भवानी पेठ 1, मांगडे चाळ 1, मनगिरे मळा 1, मंगळवार पेठ 1, घोडके प्लॉट 1, रेल्वे स्थानक रस्ता 1 असे एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर ग्रामीण मध्ये वैराग येथे 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उपळे दुमाला येथील 1, रातंजन येथील 1 व लाडोळे येथील 1 अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.