माढा : कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या माढा शहरात काल बुधवारी पाॅझिटिव्ह सापडलेल्या एका व्यापाऱ्याच्या संपर्कातील आज तिघा जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने माढा शहरात पुन्हा 4 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. यामुळे माढेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यातच नागपंचमी सणानिमित्त रिधो-याहून सुलतानपूर येथे आलेल्या पाॅझिटीव्ह माहेरवाशिनीच्या संपर्कातील आठ व्यक्ती कोरोना पाॅझीटीव्ह निष्पन्न झाले आहेत. यामध्ये त्या महिलेच्या घरातील व चुलत्याच्या घरातील व्यक्तींचा समावेश असून यामध्ये 6 महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. माढा तालुक्यातील मुंगशी गावात 9 तर मोडनिंब गावातील एका व्यक्तीचाही आजच्या अहवालात समावेश आहे.
* माहेरवाशिनीवर अगोदरच गुन्हा दाखल
रिधोरे येथील एक नवविवाहित महिला नागपंचमीच्या सणाला रिधोरे या प्रतिबंधित क्षेत्रातून आपल्या माहेरी सुलतानपूर तालुका माढा येथे आल्याचे कळाले. याच वेळी या महिलेच्या घरातील काहीजण रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे समजले. या वरुन त्या माहेरवाशिणी वरती आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत माढा पोलीस स्टेशनमध्ये या अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे .