नवी दिल्ली : 139 दिवसांनंतर आज पहिला आंतरराष्ट्री वन डे सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात होणार आहे. जुलै 2019 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच वन डे सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहे. सायंकाळी 6.30 वाजल्यापासून हा सामना सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 13 मार्चला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला होता. पण, त्यापलीकडे या सामन्याचं वेगळंच महत्त्व आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इंग्लंडचा संघ आयर्लंडविरूद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगचा श्रीगणेशा होईल. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ अशा आठ संघांना वर्ल्ड कप स्पर्धेत थेट स्थान मिळेल.
आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 10 वन डे सामने झाले आहेत आणि इंग्लंडनं 8मध्ये विजय मिळवला आहे. आयर्लंडनं 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करून सर्वांना धक्का दिला होता.
इंग्लंड-आयर्लंड वन डे मालिकेचे वेळापत्रक
30 जुलै – पहिला वन डे- साऊदॅम्प्टन
01 ऑगस्ट – दुसरा वन डे – साऊदॅम्प्टन
04 ऑगस्ट – तिसरा वन डे – साऊदॅम्प्टन
सामन्याची वेळ – सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण – सोनी सिक्स, सोनी सिक्स एचडी, सोनी LIV अॅप