सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक आणि दर काहिसे स्थिर आहेत. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक एक हजार रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर बाजार समितीत कांद्याचे लिलाव सोमवार आणि गुरुवार असे आठवड्यात दोनदाच होतात. त्यात गेल्या पंधरवड्यापासून सोलापुरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. कांद्यांचे लिलाव होऊ शकलेले नाहीत. परिणामी, बाजार बंद आहेत. येत्या ३ अॉगस्टला आता कांद्याचे लिलाव सुरु होणार आहेत. पण, गेल्या काही दिवसांत कांद्यांची आवक आणि दराचा विचार करता कांद्याचे दर काहिसे स्थिरच आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कांद्याची आवक जिल्ह्याच्या तुलनेत बाहेरुनच जास्त झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ४०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळला. या पंधरवड्याच्या आधीही आवक प्रतिदिन ३० ते ५० गाड्यापर्यंत राहिली. तर, दर प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ९५० रुपये असा दर राहिला. किरकोळ ५० ते १०० रुपयांचा फरक वगळता दर काहिसे स्थिर राहिले.
* राज्यातील कांदा दर
– सोलापुरात कांद्याला सर्वाधिक १००० रुपये दर
– नगरमध्ये १०० ते ९०० रूपये दर
– औरंगाबादमध्ये ४०० ते ७०० रुपये
– नागपुरात आठशे ते हजार रुपये
– लासलगावात ३०० ते ९९१ रुपये दर
– परभणीत ३५० ते ७५० रूपये दर
– कोल्हापुरात प्रतिक्विंटलला ३०० ते १ हजार रूपये दर
– जळगावात ३०० ते ६०० रुपये दर