नवी दिल्ली : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अभिनेत्यासह अनेकानी आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. आता यात एका टीव्ही चॅनेलमध्ये काम करणारी अँकर प्रिया जुनेजाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रियाने आज शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. प्रियाला ओळखणाऱ्यांनी सोशल मीडियावरून दुख: व्यक्त केलं आहे. तसंच प्रियाचा स्वभाव माहिती असल्यानं तिनं आत्महत्या केली यावर विश्वास नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मूळची पंजाबची असलेल्या प्रियाने दिल्ली विद्यापीठातून पदवीचं शिक्षण गेतलं होतं. त्यानंतर गुरु जंबेश्वर युनिवर्सिटी हिसार विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. न्यूज अँकरिंगशिवाय ती मॉडेलसुद्धा होती. तसंच रेडिओमध्येही तिनं काम केलं होतं. तिने आत्महत्या का केली? असा प्रश्न मित्रपरीवारातून विचारला जात आहे.
प्रियाच्या एका मित्राने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, असं काय झालं की तिने आत्महत्या केली. नुकतंच तिच्याशी बोलणं झालं होतं तेव्हा तर ती आनंदात होती. तिच्याकडं नोकरी होती, आर्थिक परिस्थितीही चांगली होती. तिच्याकडं अँकरिंगचा अनुभव होता. अशी कोणती गोष्ट तिला त्रास देत होती की ज्याबद्दल ती बोलली नाही? असंही यामध्ये मित्राने विचारलं आहे.