पंढरपूर : कोरोनामुक्त झालेल्या पंढरपूर शहरात जून महिन्यापासून कोरोनाने शिरकाव केला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पंढरपूर शहरातील हास्पिटलमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी शहरातील सहा हास्पिटल ताब्यात घेतले आहेत. माञ या हास्पिटल मधील कर्मचारी कामावर येत नसल्याने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी कडक कारवाई सुरु केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंढरपूर शहरातील अॅपेक्स हास्पिटलमधील सिस्टरसह आणखी एक कर्मचारी या दोघांविरोधात नायब तहसीलदार विजय जमादार यांनी गुन्हा दाखल केला आहे. हाॅस्पिटलमध्ये कामावर न येणारे कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय क्षेञात खळबळ उडाली आहे.
खाजगी रुग्णालयातील कर्मचारी व डाॅक्टरांनी तत्काळ वैद्यकीय सेवा देवून रुग्णांचे जीव वाचवावेत अन्यथा कर्मचाऱ्यांसह डाॅक्टरवरदेखील शासनाच्या नियमानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.