बार्शी : बार्शी तालुक्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आज रविवारी 43 ने वाढ झाली असून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजच्या बाधितांमध्ये 43 ने वाढ झाल्याने अकरा तालुक्यात एकट्या बार्शी तालुक्यामध्ये बाधितांनी हजाराचा टप्पा गाठला आहे. तालुक्यात आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला असून बाधितांचा आकडा 1 हजार 10 वर पोहचला आहे. दिलासादायक 503 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
आजच्य 43 बाधितांमध्ये 35 रुग्ण शहरामधील आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1 हजार 10 वर पोहचली आहे. त्यापैकी शहरामधील रुग्ण 580 असून ग्रामीण मधील 430 आहेत. रविवारी एकूण 5 मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्याही वाढली आहे. शहरमध्ये एकूण 20 आणि ग्रामीण मध्ये 18 असे एकूण 38 रुग्ण आजपर्यंत मयत झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यातील दिलासादायक बाब म्हणजे उपचारानंतर डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ही 503 वर गेली असून त्यापैकी शहरातील 247 तर ग्रामीणमधील 256 आहेत. बार्शी शहरामध्ये रविवारी 35 रुग्णांची वाढ झाली असून त्यामानाने ग्रामीण मध्ये फक्त 8 रुग्णच वाढले आहेत.
आजपर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णाच्या अनुषंगाने शहरामध्ये एकूण 138 प्रतिबंधात्मक क्षेत्र तर ग्रामीण मध्ये 55 तयार करण्यात आले आहेत.
स्वॅब चाचणीच्या रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार, बार्शी शहरातील बेदराई गल्ली 4, खानापूर रस्ता 2, झाडबुके मैदान 2, चव्हाण प्लॉट 2, नागणे प्लॉट 2, आझाद चौक 1, बुरुड गल्ली 1, गवळे गल्ली 2, आडवा रस्ता 1, पराग इस्टेट 1, रामभाऊ पवार चौक 2, भिमनगर 3, सावळे चाळ 2, पाटील चाळ 1, शिवाजी नगर 3, नाईकवाडी प्लॉट 1, एकता कॉलनी 1, परंडा रस्ता 1, आदर्श नगर 2, हांडे गल्ली 1 असे एकूण 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
तर ग्रामीण मध्ये वैराग 3, हत्तीज 1, चिंचोली 1, भालगाव 1, तांबेवाडी 1, पांगरी 1 असे एकूण 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.