सांगली : जिल्ह्यात आज मनपा कार्यक्षेत्रात 268 नवीन रुग्ण, शहरी भागात 4 रुग्ण, ग्रामीण भागात 22 रुग्ण आढळून आले आहेत. सांगली जिल्ह्याची रुग्णसंख्या 3 हजार 93 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 1 एक हजार 356 रुग्ण बरे झाले आहेत. 1 हजार 641 रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत. जिल्ह्यातील 96 रुग्णांचा आज अखेर मृत्यू झाला आहे.
आज अखेरची ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1 हजार 57, शहरी 212, मनपा 1824, आहे. मनपा क्षेत्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आजच्या नवीन पॉझिटिव्ह आटपाडी तालुका 1, जत तालुका 4, कवठेमंकाळ तालुका 2, खानापूर तालुका 2,मिरज तालुका 7,पलूस तालुका 2, शिराळा तालुका 2 तासगाव तालुका2, वाळवा तालुका 4, सांगली 188, मिरज 80 अशी आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आजच्या मृतांमध्ये सांगली येथील 47 व 72 वर्षांचा पुरुष, मिरज येथील 43 वर्षांची महिला, पलूस येथील 65 वर्षांची महिला, आष्टा येथील 65 वर्षांचा पुरुष, व मंगरूळ येथील 64 वर्षांचा पुरुष, यांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह पैकी 117 रुग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत.
* तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णसंख्या
आटपाडी 138, जत 158, कडेगाव 69, कवठेमहांकाळ 99, खानापूर 60, मिरज 214,पलूस 123,शिराळा 194,तासगाव 89,वाळवा 125, मनपा 1824 अशी आहे.