नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असतानाच तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
बनवारीलाल पुरोहित यांच्यात कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. कावेरी हॉस्पिटलने याबाबत मेडिकल बुलेटीन जारी केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुरोहित यांना फारशी लक्षणे दिसत नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांचं पथक लक्ष ठेवून असल्याचंही हॉस्पिटलने मेडिकल बुलेटिनमध्ये सांगितले.