पंढरपूर : पंढरपूरमधील शेतकरी कुटुंबातील अभयसिंह देशमुखने यूपीएससी परीक्षेत १५१ वे स्थान पटकावले असून त्याची आयएएससाठी निवड झाली आहे. तर, अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या माढा तालुक्यातील उपलाई बुद्रुक येथील अश्विनी वाकडे हिने २०० वा रँक मिळवला असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) नागरी सेवा २०१९ परिक्षांचा अंतिम निकाल आज ( अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती नियुक्ती यादी जाहीर करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* मंगळवेढ्यातून श्रीकांत खांडेकरचे यश
मंगळवेढा तालुक्यातील बावची येथील श्रीकांत खांडेकर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात २३१ व्या क्रमांकावर आलेला असून श्रीकांतच्या शिक्षणासाठी वडिलांनी तीन एकर जमीन विकली. प्रसंगी व्याजाने पैसे काढून तिन्ही मुलांच्या शिक्षणावर खर्च केल्याचे वृत्त आहे.