बंगळुरु : कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
यासंदर्भातील माहिती स्वतः सिद्धरामय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. देशावर ओढावलेले कोरोनाचे दुष्ट संकट अधिकच गहिरे होत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह आता राजकीय नेते देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले जात आहे.
विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी क्वारंटाइन होण्यासही सांगितले आहे. त्याचबरोबर त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरद्वारे यासंदर्भातील माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांमध्ये काही लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे.