सोलापूर : अक्कलकोटमधून योगेश कापसे हा यूपीएसी परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. यांचे पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण प्राथमिक शिक्षण लायन्स क्लब व ५ वी ते १० वी पर्यंत माध्यमिक शिक्षण मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूल येथे झाले आहे.
अकरावी बारावीचे शिक्षण शाहू कॉलेज लातूर येथे तर इंजिनिअरींग पदवी विश्वकर्मा इंजिनिअरिंग इन्स्टीट्युट पुणे येथे झाले. इंजिअरिंगमध्ये पदवी घेऊन त्यांनी दोन वर्षे हैद्राबाद येथे नोकरी केली. त्यानंतर वार्षिक सहा लाख पगार असलेले पँकेज सोडून यूपीएससीची तयारी करण्यासाठी सरळ दिल्ली गाठली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घरच्याकडूनही त्यांना पाठबळ मिळाले. आपल्या अथक परिश्रमातून व स्वतः वरील विश्वास व कष्टाच्या जोरावर युपीएससी परीक्षा पास झाला आहे. अक्कलकोट शहरातील तत्कालीन आडत व्यापारी दिवगंत कल्याणप्पा कापसे यांचा नातू तसेच कृषीनिष्ठ शेतकरी शिवकुमार कापसे यांचा चिरंजीव आहे.