मुंबई : सुशांतच्या मृत्युच्या तपासासाठी केंद्राकडून सीबीआय तपासासाठी मंजूरी दिली आहे. बिहार सरकार आणि सुशांतच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सीबीआय तपास होण्यासाठी आवाज उठवला होता. सुशांतचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी, मंत्री गेल्या अनेक दिवसापासूनंच सुशांत प्रकरणात सीबीआय तपासाची मागणी करत होते.
अद्यापही सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भात बिहार सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस केंद्राकडे केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला मान्यता दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आता हे प्रकरण सीबीआयच्या हातात गेल्यावर आणखी कोणत्या गोष्टींचा खुलासा होणार? तसंच आरोपी लवकरात लवकर पकडला जाणार का? याकडेच सगळ्यांच लक्ष आहे. सुशांत १४ जून रोजी त्याच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आला होता. त्याच्या मृत्युनंतर २ दोन महिने झाले तरी त्याच्या मृत्युचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बिहार सरकारच्या सांगण्यावरुन केंद्राने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याविषयची माहिती दिली आहे की बिहार सरकारने केलेल्या शिफारशीमुळे केंद्राने सुशांतच्या मृत्युचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यांनी सांगितलं की रिया चक्रवर्तीने देखील केंद्राकडे सीबीआय तपासाची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टात आता रियाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे ज्यामध्ये सुशांत प्रकरणाचा तपास पटनावरुन मुंबईकडे ट्रान्सफर करण्याची मागणी केली होती.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सुशांतच्या कुटुंबियांच्या मागणीवरुन याप्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयमार्फत करावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने ही मागणी मान्य केलीये. केंद्र सरकारकडून याबाबतची अधिसूचना आज संध्याकाळपर्यंत जारी केली जाणार आहे.