अयोध्या : अयोध्येत आज रामजन्मभूमीच्या जन्मस्थानी श्रीरामाचं मंदिर साकारण्यासाठी भूमीपूजन आणि शिलान्यासचा कार्यक्रम पार पडला. चांदीच्या फावड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन पार पडला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हनुमानगढ़ी मंदिर मध्ये हनुमानाची पूजा संपन्न झाली आहे. हनुमानगढीवर आरती दरम्यान त्यांच्यासोबत केवळ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ होते. आता हनुमानगढीच्या पुजेनंतर ते रामलल्लांचं पूजन केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रम पार पडला.
प्रथेनुसार, अयोद्धा नगरीचा द्वारपाल हा हनुमान आहे. त्यामुळे रामाच्या पुजेआधी त्याच्याकडून परवानगी घेण्याची प्रथा आहे. त्यानुसार सर्वात प्रथम हनुमानाची पुजा झाली आहे. नंतर भूमिपूजन आणि शिलान्सास कार्यक्रम पार झाला. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले.
मंत्रोच्चाराच्या गजरात अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडले. राम मंदिरासाठी एकूण 9 शिळांचे मोदींनी पूजन केले. पायभरणीसाठी चांदीचे फावडे वापरण्यात आले. तसेच त्याठिकाणी चांदीची वीट ठेवण्यात आली.
दुपारी 12 वाजून 44 मिनिटे 8 सेकंदापासून 12 वाजून 40 मिनिटे 44 सेकंद या 32 सेकंदाच्या कालावधीत मोदींनी राम मंदिराचे भूमिपूजन केले. हा 32 सेकंदांचा मुहूर्त भूमिपूजनासाठी शुभ मानण्यात आला होता. भूमीपूजनापूर्वी मोदींनी हनुमान गढी येथे पूजा केली. त्यानंतर एका पारिजातकाचे त्यांनी वृक्षारोपण केले.
मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत रंगलेल्या सोहळ्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करत पूजा संपन्न झाली. RSS सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सीएम योगी आदित्यनाथ देखील पूजेला बसल्याचे पाहायला मिळाले.
ऐतिहासिक आणि भव्य-दिव्य अशा राममंदिराच्या भूमिपूजन समारंभासाठी अयोध्या नगरी सजली होती. शरयू तिर भगव्या रंगाने बहरल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी देशभरातील धार्मिक स्थळांवरून पवित्र जल आणि मृत्तिका आणण्यात आली होती. मंदिराच्या उभारणीसाठीची अनुष्ठाने आणि अन्य धार्मिक विधींची पूर्तता करत सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह लगतच्या भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान आजच्या राम मंदिर भूमिपुजन आणि शिलान्यास कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी सिल्कच्या पिवळ्या कुर्ता आणि धोतर अशा पारंपारिक वेशभूषेमध्ये आले आहेत.