सोलापूर : सोलापूर शहरात आजच्या बुधवारच्या अहवालात कोरोनाचे 49 रुग्ण आढळून आले आहेत. आज दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर तब्बल 75 जणांनी मात केली आहे. त्यामध्ये 20 पुरूष आणि 29 महिला रूग्णांचा समावेश आहे.
शहरातील एकूण कोरोना बाधितांची 5 हजार 239 संख्या झाली असून त्यामध्ये पुरुष 3 हजार 48 तर महिला 2 हजार 191 रुग्णांचा समावेश आहे. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये न्यू पाच्छा पेठ परिसरातील 49 वर्षाचे पुरूषाचा आणि हनुमाननगर भवानी पेठ परिसरातील 80 वर्षाचा पुरूषाचा समावेश आहे.आतापर्यंत शहरांमध्ये 369 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुरुष 244 तर महिला 125 रुग्णांचा समावेश आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बुधवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत 678 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 629 अहवाल निगेटिव्ह तर 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 37 हजार 349 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये निगेटीव्ह अहवाल 31 हजार 845आहे तर 5 हजार 239 पॉझिटीव्ह आढळून आले. रुग्णालयात दाखल असलेल्या 1 हजार 417 पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या असून रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 3 हजार 453 आहे.