सोलापूर : आयोध्येमध्ये आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाले. अयोध्यामध्ये राममंदिर पुनर्निर्माणचा सोहळा पूर्ण होताच सोलापुरात दिवाळी साजरी करण्यात आली. ठिक ठिकाणी भगवे ध्वज, गुढ्या उभ्या करून आनंद साजरा करण्यात आला.
शहरातील अनेक चौकामध्ये धार्मिकच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. राम मंदिरात आरती पूजन , भजन करण्यात आले .
* शिवसेनेतर्फे कारसेवकांचा सन्मान
शिवसेना शहर जिल्ह्याच्या वतीने प्रभू श्री रामचंद्र मंदिर भूमिपूजानानिमित्ताने प्रभू श्रीराम व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन महाआरती व आनंदोत्सव साजरा करण्यात आला. बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा फार मोठा वाटा आहे. प्रामुख्याने सोलापुरातील शिवसैनिक सुध्दा यामध्ये सहभागी होते. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचे मत शिवसैनिकांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी विजय पुकाळे, रमाकांत आकुडे, संजय पतंगे, मल्लिनाथ अतनुरे, इरेशा खुने, संताजी माने, रणजित गडमिरे या शिवसैनिकांचा भगवे उपरणे व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पुरुषोत्तम बरडे, गुरुशांत धुत्तरगांवकर, शंकर चौगुले, नाना मस्के, लहू गायकवाड, भिमाशंकर म्हेत्रे, निरंजन बोध्दुल, संताजी भोळे, बाळासाहेब गायकवाड, धनराज जानकर, सुरेश जगताप, चंद्रकांत मानवी, विजय पुकाळे, दत्ता कलाटे, नाना मोरे, राहुल गंधुरे, गजानन केंगनाळकर, उमेश जेटगी, उज्वल दिक्षीत आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आ. विजयकुमार देशमुख यांच्या कार्यालयात रामलीला भजन
माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांच्या नवी पेठेतील संपर्क कार्यालयात रामलीला भजनाचे आयोजन करण्यात आले होते. राजस्थानी सत्संग मंडळाने हा कार्यक्रम सादर केला. नविठ्ठलदास दायमा, सत्यनारायण राठी, नीतिन पुजारी, अभिषेक स्वामी, ऋषिकेश दायमा, बाळू भोसले यांचा समावेश होता.
यावेळी नगरसेवक डॉ. किरण देशमुख, संजय कोळी, विनायक विटकर,अमर पुदाले, अनंत जाधव, राजाभाऊ काकडे,प्रसाद कुलकर्णी, उमेश कोळेकर, जगन्नाथ चव्हाण, सायण्णा गालपल्ली, सोमनाथ मेंडके उपस्थित होते. महापौर श्रीकांचना यन्नम यांनीदेखील या कार्यक्रमाला हजेरी लावली. रामलल्लाची आरती करण्यात आली. यावेळी लाडूचा प्रसाद वाटून जल्लोष करण्यात आला.
* वडाळ्यात आ. देशमुखांच्या हस्ते भूमिपूजन
अयोध्येत बुधवारी श्रीराम मंंदिराचा पायाभरणी समारंभ होत असतानाच लोकमंगल समूहाच्या पुढाकारातून वडाळा (ता. उ. सोलापूर) येथेही भव्य श्रीराम मंदिराचे भूमिपूजन माजी सहकारमंत्री तथा आ. सुभाष देशमुख यांनी सपत्नीक केले. कै. सुरेशचंद्र देशमुख यांनी 1998 साली स्थापन केलेल्या श्रीराम प्रतिष्ठान मंडळातर्फे संस्थेच्या आवारात हे भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन बुधवारी करण्यात आले. सोलापुरातले नामवंत वास्तूशिल्पकार अमोल चाफळकर यांनी या मंदिराचे संकल्पचित्र तयार केले आहे.
या मंदिरामध्ये विद्यार्थी व कर्मचार्यांकरिता योगसाधना करण्यासाठी ध्यान मंदिराचीही व्यवस्था केली जाणार आहे. यावेळी आ. देशमुख यांच्यासह स्मिता देशमुख, ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे, संस्थेचे अध्यक्ष रोहन देशमुख, संचालक मनीष देशमुख, संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी पाटील, शोभा पाटील, शिवाजी पाटील, शिला पाटील, सचिवा अनिता ढोबळे यांच्यासह लोकमंगल परिवारातील सदस्य उपस्थित होते.
* दत्त नगर येेथे यज्ञ
अयोध्येत प्रभु श्रीरामचे भव्य मंदिर होत आहे त्यानिमित्ताने विश्वहिंदु परिषद बजरंग दल यांच्यावतीने पुर्वभागातील दत्त नगर येथील श्री राम मंदिर येथे यज्ञ करण्यात आला. बजरंग दल पश्चिम महाराष्ट्र संयोजक माजी विरोधी पक्षनेत नरेंद्र काळे , परिवहन सभापती जय साळुंके यांनी यज्ञात पत्नीक आहुती दिली. हा यज्ञ यशस्वी करण्यासाठी माजी जिल्हा संयोजक अंबादास गोरंटला, शहर मंत्री दिलीप कुमार सुरवसे यांनी प्रयत्न केले. पाथरूड चौक येथे भव्य प्रतिमाचे पूजन करण्यात आले. यावेळी महेश अलंकुटे, माजी परिवहन सदस्य अनिल कदंलगी आदी उपस्थित होते
* श्रीराम युवासेनेकडून 11 फूट मूर्तीचे पूजन
श्रीराम युवासेनेच्या वतीने भवानी पेठ येथे श्रीराम जन्मभूमी पूजनाचा औचित्य साधून प्रभू श्रीरामांच्या 11 फुटी मूर्तीचे पूजन करण्यात आले व भवानी पेठ परिसरात पाचशे ध्वज लाऊन जल्लोष करण्यात आला. प्रभूंच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला व खूप सुंदर अशी रांगोळी सुध्दा काढण्यात आली.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, लक्ष्मण चव्हाण, भवानी पेठ येथील कारसेवक आप्पा शहापूरे, क्षत्रिय गल्लीतील राजूसा पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. श्रीराम युवासेनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पाटील ,अध्यक्ष आनंद गोसकी, दत्तात्रय डबरे,मल्लेश पुजारी, शिवराज पवार, लक्ष्मण इडागोटे. लक्ष्मण विटकर, सिध्दु भाईकट्टी, सुधाकर नराल,नागेश ताटी, दत्ता बडगू, सुनिल नाटीकर, मल्लिनाथ उप्पीन, सचिन धनश्री, किशोर रायचूरकर,नरसप्पा पुजारी, सिध्दुमामा करली, दशरथ गंजेळी, प्रकाश सुरवसे आदी उपस्थित होते.
* जनआधार फाऊंडेशन
जनआधार फाऊंडेशनकडुन आनंदोत्सवात साजरा करण्यात आले. यावेळी भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी अमर बिराजदार, मार्गदर्शक पांडुरंग आंबट व श्रीराम जन्मोस्तव समितीचे सदस्य सागर अतनुर, अक्षय अजंखाने, संस्थापक आनंद गोसकी, रविकांत गायकवाड,महेश दासी,पुरूषोत्तम वग्गा,शुभम मिठ्ठा, अथर्व वग्गा आदी उपस्थित होते.